पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरतो. समाजामध्ये जनजागृती घडवून आण्याकरिता पोषण अभियानांतर्गत दरवर्षी सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी , महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली माहे सप्टेंबर 2022 मध्ये पोषण महिनासाठी पंचायतीना सक्रीय करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने गाव पातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायतीना पोषण माह मधील उपक्रमांचा मुख्य आधार कणा बनवून जन आंदोलनाचे लोकसहभागात रुपांतर करणे. ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या माध्यमातून पोषण करिता लोकसहभाग ही संकल्पना आहे. त्यानुसार सप्टेबर 2022 राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याकरिता पुढीलप्रमाणे चार प्रमुख संकल्पना आहेत. महिला आणि स्वास्थ, बालक आणि शिक्षण पोषण बरोबर शिक्षण देखील , लिंग संवेदशनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थाप, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ. या संकल्पनेवर आधारित उपक्रम कार्यक्रम राबविण्याकरिता व त्या अनुषंगाने जनजागृती होण्याकरिता सप्टेंबर 2022 या महिन्याच्या प्रत्येक आठवड्यामध्ये विभागनिहाय ग्राम पातळीवर आयोजित करण्यात येणार आहेत. पोषण अभियान या उपक्रमांव्दारे समाजामध्ये जागृती घडवून आण्याकरिता प्रयत्न केले जातात. सप्टेंबर 2022 हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा होत आहे. या उपक्रमात लोकांचा सक्रिय सहभाग असण्याकरिता उपक्रमांचे नियोजन महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोषण अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजित करावयाचे आहेत.जेणेकरुन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये पूर्व शालेय शिक्षण,आहर, आरोग्य याविषयी जागृती निर्माण करता येईल. यामध्ये स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेचा देखील समावेश आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'