जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत सेवा पंधरवड्यांतर्गत लाभार्थ्यांना उद्या प्रमाणपत्र वितरण

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.): जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यांतर्गत योजना मंजूर झालेल्या लाभर्थ्यांना उद्या गुरुवार दि. 29 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी दिली. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद 10 टक्के सेस मध्ये विविध योजनांच्या मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना उद्या सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'