शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : रविवार दि. 31 जुलै, 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसुची दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.Mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारीत केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घेणेत यावी असे,आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे -01 यांनी कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'