जिल्हास्तरीय ग्रामपंचायत विकास आराखडाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम नियोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडाबाबत जिल्हास्तरावरील पुढीलप्रमाणे प्रशिक्षण कार्याक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रम स्थळी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्याकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली आहे. प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी) यांचे GDP,BPDP,DPDP संबंधिचे प्रशिक्षण दि. 27 सप्टेंबर 2022 ते 28 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे मौ.कुणकेश्वर, देवगड येथे. व पर्यवेक्षिका यांचे GPDP,BPDP,DPDP संबंधिचे प्रशिक्षण दि.29 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे मौ.कुणकेश्वर, देवगड येथे होणार आहे. तालुकास्तरीय तांत्रिक छाननी समितीच्या सदस्यांचे यांचे GPDP,BPDP,DPDP प्रशिक्षण दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद खातेप्रमुख, राज्य शासनाच्या विभागांचे जिल्हास्तरीय विभागप्रमुख यांचे GPDP,BPDP,DPDP संबंधिचे प्रशिक्षण,व जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या विभागांचे तालुकास्तरीय विभागाप्रमुखांचे GPDP,BPDP,DPDP संबंधिचे प्रशिक्षण. आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी व जिल्हा, तालुका स्तरीय लेखाधिकारी यांचेसाठी GPDP,BPDP,DPDP संबंधिचे प्रशिक्षण दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहेत. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'