सेवा पंधरड्यात गतिमानतेने लाभार्थी निवड निवडपत्र देताना मनापासून आनंद- प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : ‘राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरड्यात’ महिला व बाल विकास विभागाने गतिमान पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करुन चांगले यश मिळवले. अगदी दुर्गम भागातून आलेल्या लाभार्थ्यांना निवडपत्र देताना मनापासून आनंद होत आहे. अशा शब्दात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी विभागाचा गौरव केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिला व बाल विकास विभागाकडील योजनेचा लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निवडपत्र वितरण करण्यात आले. त्याबरोबर प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्याला चावीचे तसेच मंजुरीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, मुख्य वित्त व लेखाधिकारी वल्लरी गावडे, कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई उपस्थित होते. महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत करुन योजना आणि लाभार्थी यांची माहिती दिली. ते म्हणाले, वैयक्तिक वस्तू लाभाची योजना तसेच योजनेचे प्रशिक्षण पूर्ण झालेले लाभार्थी असे या आठवड्यात 235 जणांना लाभ दिले आहेत. सेवा पंधरवडा आणि सद्याच्या नवरात्रौत्सवात लाभार्थ्यांसाठी योजनांचा उत्सव करतोय. लाभार्थ्यांनी स्व:ताच्या उत्पन्नवाढीसाठी याचा उपयोग करावा. उर्वरित लाभार्थ्यांनाही त्यांचे लाभ लवकरच दिले जातील. किराणा, कुक्कुट पालन, शेळी पालन, संगणक प्रशिक्षण, शिलाई मशिन, सायकल, घर घंटी, विद्यूत पंप, पोर्टेबल स्प्रेपंप, ग्रास कटर याबाबत लाभार्थ्यांना निवड पत्र देण्यात आले. कणकवलीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. संध्या मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. -सोबत फोटो 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'