सेवा पंधरवड्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा -अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.) : नागरिकांना जलद सेवा देण्याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे. कालावधीत नागरिकांनी आपली शासकीय कार्यालतील कामे प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावीत. शासकीय कार्यालयामध्ये कामाची पूर्तता करण्यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहेत. तथापि, काही विभागामार्फत कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी केले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील सभागृहामध्ये सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून 16 सप्टेंबर रोजी जात प्रमाणपत्र निर्गमित करताना घ्यावयाची दक्षता व त्यातील महत्वाच्या बाबी यावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सर्व तहसिलदार तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील विधी अधिकारी डी. एस. पाटील, व्यवस्थापक संतोष कदम व विनय मोरजे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यपध्दती, जात प्रमाणपत्र निर्गमित करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.संगणकीय सादरीकरणातून मार्गदर्शन केले. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना अनुभव सांगताना जनतेला त्वरित सेवा देण्यासाठी मार्गदर्शन असणे आवश्यक असून, त्यासाठी प्रत्येक विषयांवर कार्यशाळांचे आयोजन केल्यास अधिक चांगली सेवा देण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल, असे सर्वागिण मत व्यक्त केले.
शेठ न. म. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन
सेवा पंधरवड्या निमित्त दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने शेठ न.म. विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे 11 वी व 12 वी शास्त्रच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी विषयावर उपायुक्त श्री. जाधव, यानी संगणकीय सादरीकरणातून मागदर्शन केले. त्यामध्ये मानीव दिनांकापुर्वीच्या जात नोंद असणाऱ्या पुराव्यांना अधिक महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम ऑनलाईन अर्ज भरून त्याची सॉफ्ट कॉपी व सेवा शुल्क (मात्र 100/-रूपये) भरल्याची पावती समिती कार्यालयात जमा करावी. अर्जदार, त्यांचे पालक किंवा महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांनीच पडताळणी साठीचा अर्ज कार्यालयात जमा करावा. अर्जासोबत नमुना नं. 17 चे शपथ पत्र व नमुना नं.3 ची योग्य वंशावळ नमूद असणारे शपथपत्र सादर करावे. अर्जदार यांनी मानीव दिनांकापूर्वी जातनोंद असणारे पुरावे सादर करावे, अशी माहिती दिली. या कार्यक्रमास शिक्षकवृंद उपस्थित होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी करिता अर्ज सादर करण्याबाबत आवाहन केले.
0000000
Comments
Post a Comment