जात वैधता प्रमाणपत्रासाठी तात्काळ ऑनलाईन अर्ज करावेत - उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : व्यावसायिक अभ्यासक्रम सन 2022-23 या वर्षासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी, नीट, नाटा इत्यादी परीक्षा दिल्या आहेत, परंतु अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज तात्काळ सादर करावे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी केले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असल्याने चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये. यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला नाही. त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे. त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरीत सादर करावा. जात वैधता प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाही असे हमीपत्र (स्वयंघोषणापत्र) अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सदर हमीपत्र नमुना उपलब्ध आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'