खेल रत्न, ध्यानचंद जीवनगौरव, मौलाना अबुल कलाम, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन आणि अर्जुन ॲवार्डसाठी 20 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन ॲवार्ड 2022 करीता पुरस्कारासाठी नामनिदेशनाचा प्रस्ताव दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 पर्यंत केंद्र शासनास सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. विहीत कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. असे नमूद केलेले आहे. तसेच या वर्षीपासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिता च्या मार्गदर्शक तत्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलव्दारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास dbtyas.sports.gov.in या पोर्टलवर/ वेबसाईटवर सादर करावे, असे सूचित केले आहे. ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section.sp4-moyas@gov.in किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं. 5.30 पर्यंत संपर्क करता येईल. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहीत नमुना अर्ज https://yas.nic.in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'