कसं आहे इथलं पर्यटनस्थळ... आपल्या काही सूचना आहेत का... शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साधला पर्यटकांशी संवाद

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) : 'काय काय पाहीलंत... कसं आहे इथलं पर्यटनस्थळ... आपल्या काही सूचना आहेत का...' शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी काल आपल्या दौऱ्या दरम्यान आंबोली येथील नांगरतास पाईंट व कावळेसाद पॉईंटवर आलेल्या पर्यटकांशी संवाद साधला. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात आंबोली येथून केली. या दौऱ्या दरम्यान पर्यटन स्थळानजिक महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या वतीने नियोजित सुविधांबाबत स्थळ पाहणी करुन शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आढावा घेत विविध सूचना केल्या. नांगरतास पॉईंट, कावळेसाद येथे मुंबई, नवी मुंबई, नाशिक या भागातून आलेल्या पर्यटकांशी संवाद साधत त्यांनी विचारपूस केली. त्याशिवाय पर्यटक म्हणून आलेल्या सूचनांचे स्वागतही त्यांनी केले. त्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या समक्ष दिले. यानंतर पर्यटकांनी आनंदाने मंत्री महोदयांच्या सोबत छायाचित्र आणि सेल्फीचा आनंद घेतला.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'