नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) : केंद्र शासनाकडून पीडित व संकटात सापडलेच्या महिलांचे, आर्थिक व सामाजिक सबलीकरणाचे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सन 2022 या वर्षासाठी नारी शक्ती पुरस्कारासाठी www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दीतीने दि. 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण, पारंपारिक व अपारंपारिक क्षेत्रात महिलांचे कौशल्य वाढविणे, ग्रामिण महिलांना सोयी – सुविधा पुरविणे, विज्ञान व तंत्रज्ञान, खेळ, कला, संस्कृती, महिलांची सुरक्षा, महिलांचे आरोग्य व निरोगीपणा, महिलांचे शिक्षण, कौशल्य विकास या सारख्या अपारंपारिक क्षेत्रात महिलांना प्रात्साहन देणे, महिलांचा आदर व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी केलेले कार्य याकरिता, केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रत्येक पुरस्कारासाठी भारत सरकारतर्फे रोख 2 लाख रुपये, पुरस्कार व प्रशस्तीपत्र दिले जाते. पुरस्कारासाठी पात्रता पुढीलप्रमाणे,फक्त वैयक्तिक कार्याकरिता, नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येते. वैयक्तिक पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणाऱ्या व्यक्तिचे वय दि. 1 जुलै 2022 रोजी 25 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदाराला यापूर्वी लगतच्या वर्षासाठी नारी शक्ती तसेच स्त्री-शक्ती पुरस्कार मिळालेला नसावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'