ऑनलाईन पध्दतीने महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करा - सहाय्यक आयुक्त, सचिन साळे

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती व व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजनेचे नवीन अर्ज नोंदणी व नुतनीकरण अर्ज करणेबाबत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, सचिन साळे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भेट दयावी. जिल्हयातील कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरण्यासंदर्भात कार्यशाळा घेवून परिपत्रक शाळा, महाविद्यालयांच्या नोटीस बोर्ड लावण्याविषयी आवाहन सिंधुदुर्ग जिल्हयाचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सचिन साळे यांनी केले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरणे व अर्ज छाननी करून पाठविण्याची मुदत कनिष्ठ महाविद्यालयस्तर (इ.11 वी 12 वी) साठी दि.8 ऑक्टोबर 2022 पर्यत, बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यायीनस्तर (कला, वाणिज्य, विज्ञान) दि.20 ऑक्टोबर 202 पर्यंत, व्यावसायिक अभ्यासक्रमस्तर दि.7 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहिल. तरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज वेळेवर भरून घेणेबाबत व महाविद्यालय स्तरावर अर्जांची छाननी करून प्रस्ताव मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकडे वेळेवर पाठविण्याबाबत महाविद्यालयांना सुचित करण्यात येत आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'