भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.)- सन 2020-21 करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करण्यासाठी दिनांक 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली. ज्या विजाभज,इमाव व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाही.अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावित. जिल्हयातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन 31 ऑक्टोंबर 2021 अखेर लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण या कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आवाहन श्री. दीपक घाटे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'