देवगड तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 12.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3892.1075 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 01(3778), सावंतवाडी - 00(4191.1), वेंगुर्ला - 00(3119.8) कुडाळ - 00(3800), मालवण - 47(4235.96), कणकवली - 03(4205), देवगड - 50(3394), वैभववाडी - 01(4413) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment