महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त्तचा संदेश
दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त राज्यपाल व मुख्खमंत्री यांचा संदेश
सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त्त संदेश राज्यातील जनतेसाठी प्रस्तुत करण्यात येत आहे.
भष्टाचाराविरुध्दच्या जनजागृतीच्या उपायांचा भाग म्हणून संपुर्ण राज्यात दिनांक २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सप्ताहाचे बोधवाक्य ‘स्वतंत्र भारत @ ७५: सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ हे ठरविण्यात आले आहे.
जनसामान्यांच्या मनात भ्रष्टाचार व दप्तरदिरंगाईबाबत प्रक्षोभ आहे. लहानमोठ्या कामाकरिता कार्यालयामध्ये वारंवार बोलावले गेल्यास तसेच पत्रव्यवहाराला उत्तर न दिल्यास त्याच्या मनात शासन यंत्रणेविषयी अविश्वास निर्माण होतो. यास्तव प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने वागले पाहिजे, त्याच्या समस्यांची रास्त दखल घेतली पाहिजे व विहित नियमानुसार समस्यांचे यथाशिघ्र निराकरण केले पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपला समाज भ्रष्टाचारमुक्त करण्याचा प्रत्येकाने संकप्ल केला पाहिजे.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्वजण भ्रष्टाचार -मुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबध्द होऊया.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाहासाहेब ठाकरे यांचा दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त्तचा संदेश
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृतीसाठी 26 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’ चे आयोजन करण्यात येत असल्याचे समजून आनंद झाला.
केद्रीय दक्षता आयोगाच्या धर्तीवर राज्य शासनाकडूनही या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. भ्रष्टाराविंरुध्दच्या लढाईसाठी सर्वाना सतर्क करणे आणि बळ देणे हा या सप्ताहाचा महत्वाचा उद्देश आहे, असे मला वाटते. कारण या लढ्यात राज्य शासनास नागरिकांचे सहाकार्य आवश्यक आहे. दक्षता सप्ताहासारख्या उक्रमातून भ्रष्टाचार मुक्तीच्या चळवळीत नागरिकांचा सहभाग निश्चितच वाढेल, अशी अशा व्यक्त करतो.
‘दक्षता जनजागृती सप्ताहा’ निमित्त आयोजित सर्व उपक्रमांना मन:पूर्वक शुभेच्छा !
००००
Comments
Post a Comment