इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत ह्यातीचा दाखला अपडेट करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी,दि.26 (जि.मा.का.) पेन्शनरांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेव्दारे पोस्टमन मार्फत Digital Life Certificate (ह्यातीचा दाखला) अपडेट केला जातो, त्यासाठी पेन्शनरांच्या Biometric ची आवश्यकता असते. पोस्टमन घरी येऊन पेन्शनरांचे Life Certificate अपडेट करतात. त्यासाठी नाममात्र शुल्क ७० रुपये घेतले जाते. Life Certificate घरपोच अपडेट होत असल्यामुळे पेन्शनरांना त्यांच्या पेन्शन ऑफिसला जाण्याची गरज नाही . तरी जिल्हयातील सर्व पेन्शनरांनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment