विकास आराखड्याबाबत एकदिवशीय प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) – राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा, पंचायत समिती, ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबत उद्या दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचाय विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील या कळवितात. आमचं गाव आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेल्या पुरक मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन सन 2022-23 चा वार्षिक विकास आराखडा अंतिम करण्याबाबत सुचना आहेत. हा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'