जिल्ह्यात 4 लाख 81 हजार 629 जणांनी घेतला पहिला डोस
सिंधुदुर्गनगरी, दि.6(जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 81 हजार 629 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 28 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 916 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 652 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 20 हजार 207 व्यक्तींनी पहिला डोस तर 79 हजार 185 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 42 हजार 219 नागरिकांनी पहिला डोस तर 87 हजार 470 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 99 हजार 452 जणांनी पहिला डोस तर 66 हजार 885 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 7 लाख 31 हजार 849 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 7 लाख 25 हजार 720 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 5 लाख 51 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 74 हजार 240 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 5 लाख 69 हजार 598 कोविशिल्ड आणि 1 लाख 62 हजार 251 कोवॅक्सिन असे मिळून 7 लाख 31 हजार 849 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 39 हजार 550 लसी उपलब्ध असून त्यापैकी 23 हजार 150 कोविशिल्डच्या आणि 16 हजार 400 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 900 लसी शिल्लक असून त्यापैकी 450 कोविशिल्ड आणि 450 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.
0000
Comments
Post a Comment