दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 31 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात 31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 12.1875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आजपर्यंत एकूण (4039.2825) मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 31 (3945) सावंतवाडी-3.50(4332.1) वेंगुर्ला-0(3264.2) कुडाळ-0(3978) मालवण-29(4459.96) कणकवली-12(4307) देवगड-4(3417) वैभववाडी -18(4611) असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment