कुडाळ तालुक्यात 2 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात 2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 0.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आजपर्यंत एकूण (4041.47) मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कुडाळ - 2 (3980) असा पाऊस झाला आहे. तर दोडामार्ग,सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली , देवगड आणि वैभववाडी तालुक्यात पाऊसाची आकडेवारी निरंक आहे.
Comments
Post a Comment