स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार पार्थ गोसावीयास जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) – विभागीय परीक्षा मंडळातून सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कोविड -19 च्या कालावधीमूळे सदर पुरस्काराची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यास देण्यात विलंब झालेला होता. सन 2018 -19 या शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी कु. पार्थ संतोष गोसावी इयत्ता 10 वी मध्ये विजाभज प्रवर्गातून राज्यातून प्रथम आला असल्याने त्यास स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर झालेला असून पुरस्काराची रक्कम 1 लाख रक्कमेचा धनादेश व प्रमाणपत्र, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जातपडताळणी समितीचे प्रमोद जाधव यांच्या हस्ते देण्यात आला . जिल्हयतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून प्रथम क्रमाकांने येवून अशा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'