ऑक्सीजन प्लॉट व वैद्यकीय महाविद्याल्यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी
सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.)- सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु असून नजीकच्या कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येणाचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविलेला आहे. त्याअर्थी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आय. एस. ओ मेडीकल ऑक्सिजन प्लॉट उभारणी कामाचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हयात सुरु होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने आवश्यक कामकाजास गती देणेसाठी समन्वय अधिकारी उपेंद्र तामोरे, विशेष भूसंपादन अधिकारी (इ.व.द) याची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
0000
Comments
Post a Comment