पोलीस शिपाई पदांसाठी 18 ऑक्टोबरला लेखी परीक्षा

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) – जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 21 पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची OMR लेखी परीक्षा दि. 18 ऑक्टोबर रोजी प्रवेशपत्रांवर नमुद केलेल्या परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस उपअधिक्षक एस.बी.गावडे यांनी दिली. या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र (Hall ticket) उमेदवारांच्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या परीक्षाकेंद्रांवर ओळखपत्रासह (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना इ.) वेळेत उपस्थित रहावे. उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी 18002100309 (सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत) bhartimahapolice@gmail.com, पोलीस भरती मदत केंद्र, 02362- 228008 व पोलीस नियंत्रण कक्ष 02362-228614 या वर संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'