जिल्ह्यात 5 लाख 11 हजार 90 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 11 हजार 90 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 836 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 68 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 917 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 729 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 26 हजार 551 व्यक्तींनी पहिला डोस तर 81 हजार 260 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 49 हजार 28 नागरिकांनी पहिला डोस तर 90 हजार 650 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 15 हजार 758 जणांनी पहिला डोस तर 79 हजार 469 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 7 लाख 79 हजार 266 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 7 लाख 98 हजार 180 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 6 लाख 14 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 84 हजार लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 6 लाख 5 हजार 271 कोविशिल्ड आणि 1 लाख 73 हजार 995 कोवॅक्सिन असे मिळून 7 लाख 79 हजार 266 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 64 हजार 490 लसी उपलब्ध असून त्यापैकी 49 हजार 400 कोविशिल्डच्या आणि 15 हजार 90 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 4 हजार 100 लसी शिल्लक असून त्यापैकी 4 हजार 50 कोविशिल्ड आणि 50 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'