ऊसतोडणी कामगारांच्या ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन -समाज कल्याण आयुक्त- दीपक घाटे
सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) : ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे आहे. त्यांचे जीवन सुखकारक करुन राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर आणि सुरक्षित करण्यासाठी ऊस तोडणी व्यवसायातील कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देऊन त्यांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करण्यासकरिता सहाय्यक आयुक्त जिल्हा समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा. या योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment