जिल्ह्यात 4 लाख 74 हजार 764 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.4(जि.मा.का.): जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 74 हजार 764 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 18 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 915 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 628 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 19 हजार 75 व्यक्तींनी पहिला डोस तर 78 हजार 856 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 40 हजार 650 नागरिकांनी पहिला डोस तर 87 हजार 22 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 95 हजार 289 जणांनी पहिला डोस तर 64 हजार 618 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 7 लाख 21 हजार 906 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 7 लाख 25 हजार 720 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 5 लाख 51 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 74 हजार 240 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 5 लाख 59 हजार 655 कोविशिल्ड आणि 1 लाख 62 हजार 251 कोवॅक्सिन असे मिळून 7 लाख 21 हजार 906 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 48 हजार 700 लसी उपलब्ध असून त्यापैकी 32 हजार 300 कोविशिल्डच्या आणि 16 हजार 400 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 900 लसी शिल्लक असून त्यापैकी 450 कोविशिल्ड आणि 450 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'