शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का.) सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु झाले आहेत. मागासवर्गीय मुला, मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थींनीकडून ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. तेव्हा मागसवर्गीय गरजू विद्यार्थी,विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सबंधित वसतिगृहातील गृहपाल,अधिक्षिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग दूरध्वनी क्र. ०२३६२२२८८८२ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा . असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'