चोवीस तासात मालवणात पावसाचे दीड शतक

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 150 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 58.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 4000.0325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 54 (3902), सावंतवाडी - 69 (4307.1), वेंगुर्ला - 96 (3228.2), कुडाळ - 52 (3930), मालवण - 150 (4389.96), कणकवली - 18 (4266), देवगड - 17 (3411), वैभववाडी - 15 (4566) पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 4 हजार 566 मि.मी. झाला असून त्याखालोखाल मालवण, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, दोडामार्ग आणि देवगड तालुक्यात पाऊस झाला आहे. सर्वात कमी वेंगुर्ला तालुक्यात 3 हजार 228 पूर्णांक 2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'