सामाजिक सुरक्षा व वेतन संहिता मसुद्यावर आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.११ (जि.मा.का.)- जिल्ह्यातील सर्व कार्यरत आस्थापना, संस्था मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कामगार व कामगार संघटना प्रतिनिधी यांना कळविण्यात येते की, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 व वेतन संहिता 2019(Code on Wages) च्या नियमांचं प्रारुप मसुदा राज्य शासनाकडून अनुक्रमे 27 ऑगस्ट 2021 व दि 3 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल व्दारे अधिसुचना प्रसिंध्द करण्यात आली आहे. कामगार विभागाच्या महाकामगार या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रारुपाव्दारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आले असून प्रारुपासंबंधी आपल्या आक्षेप व सुचना असल्यास प्रारुप प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून पंच्चेचाळीस दिवसांत कामगार आयुक्त , महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, इ ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे पुर्व मंबई 400051 यांना किंवा mahalabourcommr@gmail.com या ई मेलवर पाठवावेत असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'