सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 13.50 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात 13.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 1.9375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आजपर्यंत एकूण (4041.22) मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 1 (3946) सावंतवाडी-13.50(4345.6) वैभवाडी-1(4612) असा पाऊस झाला आहे. तर वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली ,आणि देवगड तालुक्यात पाऊसाची आकडेवारी निरंक आहे.
00000
Comments
Post a Comment