शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी दि.16(जि.मा.का): Maha DBT प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 चे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत दिनांक 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यानी विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन वंदना कोचुरे मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना, राजर्षी शाहु गुवणत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती इ. योजना राबविल्या जातात. योजनेकरिता विद्यार्थी या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करु शकतात.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी तसेच ज्या विद्यार्थ्यांचे त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी सदर मुदत वाढीचा लाभ घ्यावा. मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातील कार्यरत असलेल्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यानी विद्यार्थ्याचे अर्ज त्वरीत निकाली काढावेत. शिष्यवृत्ती पासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीने संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत.असे आवाहन वंदना कोचुरे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment