चर्मकार समाजासाठी स्माईल योजना
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी स्माईल अर्थात सपोर्ट फॉर मार्जिनाईलझ्ड इंडिवीड्युअल्स फॉर लाईव्हलीहू़ अँड एन्टरप्राईज ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोवीड 19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावली आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मार्फत 5 लाख रुपयांपर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.
या योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. एन.एस.एफ.डी.सी. कर्ज 4 लाख रुपये, भांडवली अनुदान 1 लाख रुपये यावरील व्याजदर 6 टक्के असणार आहे.
या योजनेसाठी मयत व्यक्तीची आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे आहे. मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात, पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्ना( 3 लाख रुपयांच्या आत)
कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तींनी सदरची माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, तळमजला, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयात किंवा https://forms.gle/Q485fSUQYEuL4xYx7 या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने भरावी असे आवाहन एन.एम.पवार, जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment