जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे धुमशान मालवण तालुक्यात सर्वाधिक 190 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वच तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. कुडाळ वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शतक पार केले असून मालवण तालुक्यात सर्वाधिक 190 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 143 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 630.7मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 118(640), सावंतवाडी - 172(768.3), वेंगुर्ला - 128.4 (512.4), कुडाळ - 92(507), मालवण - 190(693), कणकवली - 142(692), देवगड - 150(623), वैभववाडी - 156(610), असा पाऊस झाला आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'