सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 66 पूर्णांक 4 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 908.13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 95(1031), सावंतवाडी - 100(1083.7), वेंगुर्ला – 48.2(711.4), कुडाळ - 60(795), मालवण - 45(881), कणकवली - 65(998), देवगड - 38(777), वैभववाडी - 80(988), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment