मालवण पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण (3010) येथे फर्स्ट इयर डिप्लोमा या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बुधवार दि. 30 जून ते दि. 31 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीमध्ये मध्ये E-Scrutiny व Physical E-Scrutiny असे दोन पर्याय आहेत. कोविड-19 च्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजनामध्ये सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळणे या साठी E-SCRUTINY या पर्यायची निवड, विद्यार्थी व पालकांनी करावी. Physical E-Scrutiny या पर्यायामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून, प्रिंट घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहाणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.
शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे एकूण 320 प्रवेश क्षमतेसह स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी (प्रवेश क्षमता -30), संगणक (Computer) अभियांत्रिकी (प्रवेश क्षमता -60), विद्युत (Electrical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता - 60), अणुविद्युत (Electronics & Communication) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता - 60), यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी (प्रवेश क्षमता - 60) व अन्न तंत्रज्ञान (Food Technology) (प्रवेश क्षमता - 20) या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रियेसाठी विहित मुदतीत प्रवेश अर्ज सुविधा केंद्रांमध्ये जमाकरून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रिया समन्वयक म्हणून डॉ. संजय चोपडे काम पहात असून अधिक महितीसाठी https://poly21.dtemaharashtra.gov.in/diploma21/ या संकेतस्थळावर तसेच प्रा.डी.एन.गोलतकर-9764513133, डॉ. वाय. व्ही. महाडिक - 9423682846 यांच्याशी संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment