प्रशिक्षणार्थीच्या नावात, दुरुस्तीची संधी
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी
प्रवेश सत्र 2014 पासून अजपर्यंत प्रवेशीत झालेले व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या नावात,आईच्या नावात, जन्मतारीख व फोटो इत्यादी चुका असतील तर त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून NCVT MIS Portal Grievance User Manual of Traiees ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
प्रशिक्षणार्थी परीक्षेविषयक ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेतील विषयांबाबत Grievance नोंदवू शकतो.स्वत:च्या नावातील, आई वडील यांच्या नावातील जन्म्तारीख तसेच फोटो इत्यादी बाबींमधील दुरुस्तीसाठी Grievance नोदवू शकता. फोटो दुरुस्तीसाठी सुधारित फोटो घेऊन प्रशिक्षणार्थ्यांने आद्यौगिक प्रशिक्षण संस्थात उपस्थित राहून सादर करावा लागेल. दुरुस्ती करणेबाबतची ही शेवटची संधी असून अधिकच्या माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 02363-272136,295136 किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9423304735, 8007363988, 9420910912 वर संपर्क साधावा असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था र.फ.पाटील सावंतवाडी बाहेरचा वाडा,सावंतवाडी, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment