जिल्ह्यात 1 लाख 99 हजार 737 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 99 हजार 737 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 757 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 922 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 512 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 867 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 82 हजार 988 व्यक्तींनी पहिला डोस तर 25 हजार 710 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 77 हजार 269 नागरिकांनी पहिला डोस तर 9 हजार 516 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 20 हजार 211 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 205 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 2 लाख 52 हजार 957 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 2 लाख 44 हजार 460 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 85 हजार 580 लसी या कोविशिल्डच्या तर 58 हजार 880 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 95 हजार 705 कोविशिल्ड आणि 57 हजार 252 कोवॅक्सिन असे मिळून 2 लाख 52 हजार 957 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 3 हजार 200 लसी उपलब्ध असून त्यापैकी 680 कोविशिल्डच्या आणि 2 हजार 520 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 640 लसी शिल्लक असून त्यापैकी 540 कोविशिल्ड आणि 100 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'