दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 30 पूर्णांक 925 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 939.055 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 53(1084), सावंतवाडी - 27(1110.7), वेंगुर्ला - 31.40(742.8), कुडाळ - 14(809), मालवण - 18(899), कणकवली - 48(1046), देवगड - 46(823), वैभववाडी - 10(998), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment