जिल्ह्यात पावसाचे शतक, सरासरी 105 मि.मी. पावसाची नोंद
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 105 पूर्णांक 37 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 487.15मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 132(522), सावंतवाडी - 99(596.3), वेंगुर्ला - 134 (384), कुडाळ - 129(415), मालवण - 132(503), कणकवली - 70(550), देवगड - 89(473), वैभववाडी - 58(454), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment