कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.1 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1042.61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 44(1160), सावंतवाडी - 84(1293.7), वेंगुर्ला – 53.8(806.2), कुडाळ - 82(913), मालवण - 97(1001), कणकवली - 105(1156), देवगड - 58(885), वैभववाडी - 45(1126), असा पाऊस झाला आहे.
Comments
Post a Comment