सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 25 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 971.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 27(1116), सावंतवाडी - 87(1209.7), वेंगुर्ला - 00(752.4), कुडाळ - 18(831), मालवण - 05(904), कणकवली - 02(1051), देवगड - 02(827), वैभववाडी - 59(1081), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment