कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.15 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1071.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 12.00 (1172), सावंतवाडी - 20.00 (1313.70), वेंगुर्ला – 28.20 (834.40), कुडाळ - 44.00 (957.0), मालवण - 36.00 (1037.0), कणकवली - 37.00 (1193.0), देवगड - 22.00 (907.0), वैभववाडी - 34.00 (1160.0), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment