जागतिक बालकामगार विरोधी दिन 12 जून

सिंधुदुर्गनगरी दि.11(जि.मा.का): बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी या करिता सातत्याने शासनाच्या विविध विभागामार्फत व विविधस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. 14 वर्षा खालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामगार ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्हयासाठी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान रु.20 हजार व कमाल रु.50 हजार इतका दंड किंवा दोन्ही ही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्हयाची पुनरावृत्ती झाल्यास, किमान 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सर्व औद्योगिक संघटना, असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, क्रिडाई- बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन,सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, नागरीक यांनी ही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करुन या मोहिमेत सहभाग नोंदवावा व आपला जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'