भारतीय टपाल खाते आंतरराष्ट्रीय योगा दिनानिर्मी देशातील 800 ठिकाणी विशेष रद्दीकरण शिक्का जारी करणार

सिंधुदुर्गनगरी दि.18(जि.मा.का): युनायटेड नेशन्स्‍ असेंब्लीने युएनजीए 11 डिसेंबर 2014 रोजी घेतलेल्या ठरावानुसार 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. सन 2015 पासून हा दिवस जगभरात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो . सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 21 जून रोजी जागतिक योग दिनाचे सार समजावे यासाठी पोष्ट विभाग विशेष रद्दीकरण शिक्का (Special Canellation Stamp) जारी करणार आहे. हा अनोखा उपक्रम 7 व्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय योग दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जाईल. भारतीय डाक विभाग हे विशेष कॅन्सलेश्न स्टॅम्प संपूर्ण भारत भरातील 810 मुख्य पोस्ट कार्यालयांव्दारे सचित्र डिझाइनसह जारी करेल. हा समारंभ आता पर्यतच्या एकाच वेळी होणाऱ्या सर्वात मोठ्या फिलेटेलिक समारंभपैकी एक ठरणार आहे. कोविड-19 साथीचा देशभर असलेल्या प्रादुर्भावाचा विचार करता बहुतेक कार्यक्रम व्हर्चुअल पध्दतीने आयोजित करुन मुख्य ब्रीद वाक्य "Be with Yoga, Be at Home" चा प्रचार करीत आहे. देश सावधपणे लॉकडाउनमधून बाहेर पडत असल्याने 800 हून अधिक संग्रहणीय असलेली ही विशाल टपाल स्मरणोत्सव बऱ्याच फिलाटेलीक संकलकांसाठी संधी उपलब्ध करुन देतील. कदाचित देशामध्ये फिलोटेलीक क्रियाकलाप पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा आहे. योग आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस हे फिलेटिक सग्रहकांसाठी वर्षानुवर्ष लोकप्रिय असलेले विषय आहेत. अशा प्रकारचे फिलेटेलिक काऊंटर आणि फिलेटेलिक ठेव खाते उघडण्याची सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण आणि सावंतवाडी मुख्य डाक घर येथे उपलब्ध आहे. पोस्ट विभागाने जाहिर केलेल्या या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी जिल्ह्यातील मालवण आणि सावंतवाडी या दोन्ही प्रधान डाक कार्यालयांना मिळाली आहे. येत्या 21 जून रोजी ही दोन्ही कार्यलये या संस्मरणीय समारंभात सहभागी होणार आहेत. अशी माहिती अधिक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'