कणकवली तालुक्यात सर्वाधिक 135 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 76 पूर्णांक 72 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 381.78 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 124(390), सावंतवाडी - 120.8(497.3), वेंगुर्ला - 43 (250), कुडाळ - 70(286), मालवण - 49(371), कणकवली - 135(480), देवगड - 35(384), वैभववाडी - 37(396), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment