कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्प फुल्ल 9 लघु पाटबंधारे प्रकल्पही तुडुंब

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) - देवगड तालुक्यातील कोर्ले - सातंडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला असून या प्रकल्पामध्ये 25.4740 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून सध्या 111.40 घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये वेगाने वाढ होत असून 9 लघु पाटबंधारे प्रकल्पही 100 टक्के भरले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, माडखोल, सनमटेंब, कुडाळ तालुक्यातील हातेरी, निळेली, पावशी, पुळास आणि कणकवली तालुक्यातील हरकुळ व ओझरम या लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 135.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 261.0290 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 58.35 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 47.5160, अरुणा – 22.9464, कोर्ले- सातंडी – 25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.8753, नाधवडे – 3.5767, ओटाव – 1.1745, देंदोनवाडी – 0.6563, तरंदळे – 1.0300, आडेली – 0.8340, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 1.4470, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.1060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.4550, दाभाचीवाडी – 0.9540, पावशी – 3.0300, शिरवल – 2.3210, पुळास – 1.5080, वाफोली – 0.8920, कारिवडे – 0.6840, धामापूर – 1.7410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.4240, ओझरम – 1.8190, पोईप – 0.8530, शिरगाव – 0.4140, तिथवली – 0.7820, लोरे – 1.7550 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'