जिल्हा रुग्णालयातील उत्तम उपचारामुळे आमचा रुग्ण ठणठणीत 60 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – ऑक्सिजनची पातळी 73 पर्यंत कमी झालेली. श्वास घेण्यास त्रास होत होता. धाप लागलेली अशा परिस्थितीत आम्ही आमच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उत्तम उपचार मिळाल्यानेच आमचा रुग्ण ठणठणीत झाल्याची भावना व्यक्त केली आहे, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावातील कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांनी. थकवा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कलंबिस्त येथील 60 वर्षीय महिलेस सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखवले होते. तिथे कोरोनाची चाचणी केली. अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून 108 रुग्णवाहिकेची सोय ही करण्यात आली. दाखल केले त्यावेळी त्यांची ऑक्सीजनची पातळी 73 पर्यंत खाली आली होती. पण, योग्य उपचार, डॉक्टर्स, नर्स यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य यामुळे आज या 60 वर्षीय महिला ठणठणीत बऱ्या होऊन नातेवाईकांमध्ये परतल्या आहेत. याकाळात रुग्णालयातील अनुभवाविषयी त्यांचे नातेवाईक सांगतात, थकवा जाणवू लागल्यामुळे सुरुवातीस स्थानिक डॉक्टर्सना दाखवले. त्यांनी कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल केले. त्यावेळी त्यांची ऑक्सीजनची पातळी खाली आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना तिथेच दाखल केले. कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना तातडीने दाखल करून घेत उपचार सुरू केले. नियमितपणे सर्व तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टर्स दररोज रुग्णांची विचारपूस करण्यासाठी येत होते. नर्सही वेळेवर औषधे देण्यासाठी तत्पर असत. ऑक्सीजन पातळी कमी असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनच्या आधारावर ठेवले होते. काही दिवस व्हेंटिलेटरही लावण्यात आला. 28 दिवस त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांना प्रकृतीचे आणखी काही त्रासही होते. त्यामुळे डॉक्टर्स विशेष लक्ष देत होते. मनसिकता टिवण्यासाठी समुपदेशनही करण्यात आले. या संपूर्ण काळामध्ये त्यांना चांगले जेवणही मिळत होते. डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम उपचार केले. त्यामुळेच त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षाही चांगली झाली आहे. त्या आता ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'