वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 161 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 161 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 113 पूर्णांक 625 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 744.33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 137(777), सावंतवाडी - 89(857.3), वेंगुर्ला - 90(602.4), कुडाळ - 128(635), मालवण - 70(763), कणकवली - 147(839), देवगड - 87(710), वैभववाडी - 161(771), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment