दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 83 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 83 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 60 पूर्णांक 6 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 841.73 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 83(936), सावंतवाडी - 76.20(983.7), वेंगुर्ला - 46.6(663.2), कुडाळ - 56(735), मालवण - 70(836), कणकवली - 60(933), देवगड - 19(739), वैभववाडी - 74(908), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment