कणकवली तालुक्यात सर्वाधिक 45 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 45 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.00 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1091.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 12.00 (1184), सावंतवाडी - 34.00 (1347.70), वेंगुर्ला – 09.00 (843.40), कुडाळ - 17.00 (974.0), मालवण - 02.00 (1039.0), कणकवली - 45.00 (1238.0), देवगड - 02.00 (909.0), वैभववाडी - 39.00 (1199.0), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment