इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जाच्या लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का): जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जाच्या परत फेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. योजनेनुसार थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रक्कमेवर 2 ट्टके सुट देण्यात येईल. योजना ठराविक कालावधीसाठी आहे. खाते बंद केल्यावर महामंडळाच्या नवीन रुपये 10 लक्ष व्याज परतावा योजनेतंर्गत लाभ घेता येईल. तरी संबधितांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रिती पटेल जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या,सिंधुदुर्ग यांनी केला आहे.
0000
Comments
Post a Comment